रसिलाच्या खून प्रकरणी आरोपीला फाशी व्हावी; नातेवाईकांची मागणी

एमपीसी न्यूज – रसिलाच्या खुनाचा तपास कसा सुरू आहे तसेच केस संदर्भात रसिलाचे वडिल, भाऊ व इतर नातेवाईक तसेच महाराष्ट्र कामगार युनियनचे सरचिटणीस व इंटक संघटनेचे कार्याध्यक्ष राजन नायर यांनी आज पुणे पोलिसांची आयुक्तालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी रसिलाचा खून करणा-या आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

रसिलाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी आणि 1 कोटी रुपये देण्याची मागणी कंपनीकडे केली आहे. तसेच इशुरन्स व इतर असे 25 लाख रुपये मिळतील, असे नातेवाईकांनी सांगितले आहे. तर यावेळी कंपनीची सुरक्षा चांगली असावी. कंपनीतून घरापर्यंत सुरक्षा द्यावी आणि आरोपीला फाशी व्हावी, अशी अपेक्षा रसिलाच्या वडिलांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे रसिलाला काही वरिष्ठ अधिकारी त्रास देत होते, याबाबत विचारले असता, त्याची काही कागदपत्रे पोलिसांना दिली आहेत. पोलीस व आमच्यात चांगले संबंध आहेत, असेही स्पष्ट केले.

यावेळी रसिलाचे वडील आणि भाऊ यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची विनंती केली होती. ती पोलिसांनी मान्य केली आहे. रसिलाच्या केबिनमध्ये इतरही काही लोक असण्याच्या शक्यता आहेत, असा आम्हाला संशय होता. यासाठी आम्हाला  सीसीटीव्ही फुटेज पाहायचे होते, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर व रसिलाचा भाऊ लेझीम ओ पी. यांनी दिली.             
    

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.