…आणि यांना चाखावी लागली पराभवाची चव

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यंदा झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत देशात आणि राज्यात आलेल्या भाजपाच्या लाटेत अनेक विद्यमान नगरसेवकांना तसेच मुरलेल्या राजकारण्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र याच वेळी काहींनी आपला आब सांभाळून पद राखण्यात यश मिळवले.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत अनेक मान्यवरांना पराभवाची कडू गोळी पचवावी लागली असून काही नवोदितांना पहिल्यांदाच नगरसेवकपदाची लॉटरी लागली आहे. यात सहा वेळा नगरसेवक राहिलेले माजी महापौर आर. एस. कुमार, विद्यमान महापौर शकुंतला धराडे, भाऊसाहेब भोईर, भारती फरांदे, सचिन लांडगे, मारुती भापकर, सुलभा उबाळे, प्रतिभा भालेराव, मंदाकिनी ठाकरे, शांताराम भालेकर, धनंजय आल्हाट, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, नारायण बहिरवाडे, सीमा फुगे, राजेश पिल्ले, राजेश फलके, संदीप चिंचवडे, अनंत को-हाळे, राजेंद्र जगताप, सुषमा धनाजी खाडे, शुभांगी बो-हाडे, अश्विनी सचिन चिखले, तानाजी विठ्ठल खाडे, शुभांगी जाधव, राहुल जाधव, सारंग कामतेकर, वैशाली तरस पराभूत झाले आहेत.  

तर राजू मिसाळ, जावेद शेख, वैशाली घोडेकर, राहुल कलाटे, अजित गव्हाणे, मंगला कदम, उषा वाघेरे, सुजाता पालांडे, डब्बू आसवानी, मोरेश्वर भोंडवे, दत्ता साने, नितीन लांडगे, विलास मडिगेरी, एकनाथ पवार, सचिन चिखले, अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, राहुल कलाटे, झामाबाई बारणे विजयी झाले आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.