डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत असोसिएशन पूना सोशलचा विजय

 एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) यांच्या तर्फे घेतलेल्या डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात असोसिएशन पूना सोशल संघाने रुपाली एससी संघाचा 2-1 असा पराभव करत विजय मिळवला.

पीडीएफएच्या ढोबरवाडी येथील फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम श्रेणी गटातसाखळी फेरीत अ गटात रामनाथ सीव्ही., शबीर शेख यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर असोसिएशन पूना सोशल संघाने रुपाली एससी संघाचा 2-1 असा पराभव केला. पराभूत संघाकडून निखिल धनकुडेने एक गोल केला.

अ गटात उपसा व जॉली रेंजहिल्स एफसी यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. उपसाकडून तेजस नखातेने, तर जॉली रेंजहिल्स एफसीकडून प्रफुल चौधरीने एक गोल केला. ब गटात टायगर्स कम्बाईन व घोरपडी यंग वन्स यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 

गट अ: उपसा: 1(तेजस नखाते 24मि)बरोबरी वि.जॉली रेंजहिल्स एफसी: 1(प्रफुल चौधरी 12मि);

गट ब: टायगर्स कम्बाईन: 0 बरोबरी वि.घोरपडी यंग वन्स: 0

गट क: सिटी क्लब: 1(सचिन साव 15मि)बरोबरी वि.रेंजहिल्स मिलान: 1(प्रथमेश रंगा 47मि);

गट अ: असोसिएशन पूना सोशल: 2(रामनाथ सीव्ही 8मि.,शबीर शेख 44मि.)वि.वि.रुपाली एससी: 1(निखिल धनकुडे 12मि.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.