तळेगाव नगरपरिषद पाणी पुरवठा विभागातर्फे इंद्रायणी जॅकवेलवर नवीन मोटरचे पूजन

एमपीसी न्यूज – तळेगाव नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाच्या वतीने इंद्रायणी जॅकवेलवर नवीन 100 HP मोटरचे पूजन करण्यात आले असून ती मोटार चालूही करण्यात आली.

यावेळी पाणी विभागाचे सभापती, उपनगराध्यक्ष सुनील शंकरराव शेळके तसेच सर्व विभागाचे सभापती, नगरसेवक आणि  नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी तळेगाव स्टेशन भागात 4 MLD (40,00000) ने पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, आता या नवीन पंपामुळे ते 5 MLD (50,00000) ने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे शहरातील पाण्याची अडचण कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या माध्यमातून तळेगावच्या नागरिकांना थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.