गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

मेदनकरवाडीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण

अज्ञातावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मेदनकरवाडी ( ता. खेड) येथून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. 

सक्षम बाळासाहेब सोनवणे (वय – 15 वर्षे, रा. मेदनकरवाडी, ता. खेड ), असे अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. त्याचे वडील बाळासाहेब रावजी सोनवणे ( वय- 42 वर्षे ) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्षम हा मेदनकरवाडी येथे त्याच्या आई-वडिलांकडे राहत होता. मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला पळवून नेले असल्याची फिर्याद बाळासाहेब यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी सक्षम याचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार सोपान राक्षे यांनी दिली.

पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय जाधव, नामदेव जाधव व त्यांचे अन्य सहकारी या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Latest news
Related news