एमआयएमचे पुणे शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख यांची पक्षातून हकालपट्टी

एमपीसी न्यूज – ऑल इंडिया मज्जलिस-ई-इत्तेहादिल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे पुणे शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत तिकीट देताना आमदार इम्तीयाज जलील यांनी उमेदवारांकडून पाच ते दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

याविषयी जलील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात त्यांची कार्यपद्धती चुकीची होती. त्यासंबंधीच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई होणारच होती. त्यांनी पैसे घेतल्याचे केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. पुणे शहराध्यक्षपदी लवकरच नव्याने निवड केली जाईल.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एमआयएमला येरवड्यातून एका जागेवर विजय मिळाला होता. जुबेर शेख यांनी निवडणुकीला फक्त पाच दिवस राहिले असताना जलील यांनी पुण्यात येऊन येथील वातावरण खराब केले. शहरात जेवढ्या सभा, मेळावे झाले त्याचा संपूर्ण खर्च आम्हीच केला,’ असा आरोप शेख यांनी केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.