शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांची आकुर्डीत बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेनेच्या उमेदवारांची आज (रविवारी) बैठक झाली. बैठकीत पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली.

आकुर्डी येथील शिवसेनाभवनात झालेल्या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, शिवसेनेच्या महापालिकेतील गटनेत्या सुलभा उबाळे, सल्लागार भगवान वाल्हेकर, अनंत को-हाळे यांच्यासह सर्व पराभूत उमेदवार उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. शिवसेनेचे नऊच नगरसेवक निवडून आले आहेत. गेल्यावेळी पेक्षा शिवसेनेचे संख्याबळ घटले आहे. मात्र, स्वबळावलर लढलेल्या शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे.

ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाला आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा शिवसेनेला फटका बसला. अनेक ठिकाणी प्रभागातील उमेदवारांमध्ये एकी नव्हती. स्वतंत्र प्रचार करत होते, अशा तक्रारी पराभूत उमेदवारांनी बैठकीत मांडल्या. तसेच नेते सभा घेण्यात कमी पडल्याच्या तक्रारीही काही उमेदवारांनी केल्या.

शिवसेनेने अनेक पराभव पचवले आहेत. पराभूत उमेदवारांनी नाऊमेद होऊ नये. जोमाने पक्षाचे काम करावे. पक्ष संघटन करण्यावर भर द्यावा. प्रभागातील कामे करावीत, असे मार्गदर्शन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

निवडून आलेल्या नगरसेवकांनी सत्ताधा-यांवर अंकुश ठेवावा. विकासाला पाठिंबा आणि चुकीच्या कामाला विरोध करावा.

"advt"

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.