पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक महिलादिनानिमित्त विविध स्पर्धा व व्याख्यान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात जागतिक महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व पिंपरी-चिंचवड वुमन्स सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने बुधवारी 8 मार्चला व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मीडिया तंत्रज्ञानातील आपली सुरक्षितता व सावधानतेची काळजी कशी घ्यावी. या विषयावर सायबर सेक्युरिटीच्या डॉ. हेराल्ड डिकोस्टा या मार्गदर्शन करणार आहे.

हा कार्यक्रम चिंचवड येथील अॅटो क्लस्टर समोर सायन्स पार्क येथे सकाळी दहा वाजता होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या महिलाअध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी दिली. यावेळी मंजू लोहोट, दिपाली जाधव, सुनीता आल्हाट, शुभांगी केदार, ज्योती हजारे, वैशाली आव्हाड, रेखा चोपडे आदी विविध क्षेत्रातील महिला उपस्थित राहणार आहे.

सांगवी येथे शनिवारी (दि. 11) गजानन महाराज मंदिरासमोर, कै. शिवाजी ढोरे व्यासपीठ येथे सायंकाळी 6.00 वाजता राही-माई महिला प्रतिष्ठान व जे.डी.ग्रुपच्या वतीने मिसेस सांगवी हा कार्यक्रम महिलांसाठी घेण्यात आला आहे. तसेच विविध परंपरेतील पोशाख परिधान करणे, कोणत्याही प्रकारातील एक सोलो नृत्य सादर करणे या स्पर्धा घेण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धेसाठी बक्षिसे वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. मराठी अलंकारिक भाषेत उखाणा स्पर्धाही घेण्यात आली आहे, अशी माहिती नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे यांनी दिली.

जागतिक महिलादिनानिमित्त (दि. 8 मार्च) विश्व श्रीराम सेनेच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष अक्रम शेख यांनी दिली. यावेळी प्रभाग क्रमांक 14 चे  नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर नागरी सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम  मंगळवार 7 मार्चला सकाळी दहा ते एक यावेळेत आकुर्डी येथील  विठ्ठल मंदिर पालखी स्थळ येथे होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.