शनिवार, डिसेंबर 3, 2022

तुझ्यात जीव रंगलाचा ‘राणा’ आता दिसणार मोठ्या पडद्यावर

हार्दिक जोशी साकारणार  खलनायकाची भूमिका       

एमपीसी न्यूज- ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घरोघरी पोहोचलेला हार्दिक जोशी म्हणजेच राणा आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. आतापर्यंत आपण त्याला मालिकेतून पाहिले. आता तो छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. साधा भोळा असणारा राणा त्याच्या आगामी चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत  दिसणार आहे.

पार्थ प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या "जर्नी प्रेमाची" या मराठी चित्रपटातून तो मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याच्या बरोबर माधव देवचक्के (सरस्वती- कलर्स मराठी फेम), अभिषेक सेठिया, काश्मिरा कुलकर्णी हे कलाकार दिसणार आहेत. सोबत आश्लेषा सिंग, वर्षा एरणकर, अतुल अभ्यंकर, पराग बेडेकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

मालिकांद्वारे घराघरात पोहोचलेले दिग्दर्शक अमोल भावे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून, संवादही त्यांनीच लिहिले आहेत. कथा पटकथा राहुल पंडित, हिलाल अहमद व दिनेश देवळेकर यांनी लिहिली आहे. नृत्य दिग्दर्शन विकी खान यांचे असून, कला दिग्दर्शन संदेश निटोरी यांचे आहे. संकलन जफर सुल्तान यांचे असून वेशभूषा एकता भट यांनी केली आहे. जर्नी प्रेमाची हा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी (दि.10) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असल्याची माहिती पार्थ शाह व निर्माते आदिल बलोच यांनी सांगितली.

Latest news
Related news