येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – पर्वती जलकेंद्र पंपींग, रॉ वॉटर पंपींग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी (वारजे) जलकेंद्र, नवीन होळकर पंपींग येथील विद्युत आणि पंपींगविषयक तसेच स्थापत्य विषयक देखभाल -दुरुस्तीचे काम करायचे आहे. त्यामुळे या जलकेंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व भागांचा येत्या गुरूवारी (दि. 9) संपूर्ण दिवसभरासाठी  बंद राहणार आहे. शुक्रवारी उशिरा आणि कमीदाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट, पर्वतीदर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारारस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वेरस्ता ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोन वरील मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्‍वा नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं. 42, 46 (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र, हिंगणे, आनंदनगर, वडगाव,धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज,भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रुंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधा नगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरणाचा परिसर, औंध,बावधन,सूस, सुतारवाडी, भूगावरस्ता परिसर, लष्कर भाग, पुणे रेल्वेस्थानक, मुळा रर्स्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूररस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगररस्ता परिसर.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.