महिला दिनानिमित्त महिला नवमतदारांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मतदान ओळखपत्रांचे वाटप

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड मतदारसंघाच्या वतीने बुधवारी (दि.8) महिला नवमतदारांना मतदान ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.

हे वाटप चिंचवड मतदार संघाचे नोंदणी अधिकारी सहआयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक नामदेव उतळे, शोभा जाधव, संजिवनी राऊत, आत्माराम महाकाळ, अरुण कडूस, दीपक कन्हेरे, देवेंद्र घोडके आदी उपस्थित होते.

महिला मतरांचा मतदानाचा टक्का वाढावा, त्यांनाही त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावे, तसेच त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याच्या हेतूने खास महिला दिनाचे औचित्य साधून महिला नवमतदारांना ओळखपत्रांचे काल वाटप करण्यात आले. तसेच त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.