वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या उत्सवमूर्तीचे पुण्यात जल्लोषात स्वागत

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दर्शन सोहळा

एमपीसी न्यूज – श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या उत्सवमूर्तीचे आगमन समाधी क्षेत्र गरुडेश्वर, गुजरात येथून पुण्यामध्ये झाले. अखिल भारतीय त्रिपदी परिवार, पुणे तर्फे महाराजांच्या उत्सवमूर्ती दर्शनार्थ  कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात ठेवल्या असल्याने भाविकांनी मोठया संख्येने दर्शनाचा लाभ घेतला. फुलांच्या पायघडया घालून उत्सवमूर्तीचे स्वागत करून आरती करण्यात आली.


दत्तमंदिर ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश काकडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उप उत्सवप्रमुख चंद्रशेखर हलवाई, विश्वस्त युवराज गाडवे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे सुभाष कुलकर्णी, संजय नाखाडे, तेजस तराणेकर, लाडकारंजा येथील देवस्थानचे अध्यक्ष नारायणराव खेडकर, वासुदेव प्रबोधिनी इंदोर येथील समन्वयक संस्थेचे तुषार काळे आदी उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे म्हणाले, स्वामी महाराजांची ही उत्सव मूर्ती श्री क्षेत्र गरुडेश्वर येथून हावनूर, कर्नाटक येथील चातुर्मास स्थळी जाण्यास निघाली आहे. श्री क्षेत्र गरुडेश्वर दत्तमंदिराचे कार्यकारी विश्वस्त चंद्रकांत गवारीकर, मुख्य पुजारी दिगंबर नवरे आणि त्यांचे सहकारी ही मूर्ती घेऊन आले. या मार्गात उत्सवमूर्तीचा मुक्काम पुण्यामध्ये असल्याने पुणेकरांना टेंबे स्वामी यांच्या मूर्तीचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ट्रस्टतर्फे या सोहळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.