नियोजित महापौर काळजे यांच्या डोक्यावर हायकोर्टातील याचिकेची टांगती तलवार

घनःश्याम खेडकर यांनी दिले जात प्रमाणपत्र वैधतेला आव्हान

 

एमपीसी न्यूज – नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातून निवडून आलेले भाजपचे महापौरपदाचे उमेदवार नितीन काळजे यांच्या जात प्रमाणपत्र वैधतेला मुंबई उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे. त्यामुळे काळजे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक व त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार घन:श्याम खेडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नगरसेवक काळजे यांनी कुणबी मराठा जातीचा दाखला सादर करून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. काळजे निवडून आले आहेत. 2012 मध्येही ते निवडून आले होते. त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेला आता उच्च न्यायालयात आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे काळजे यांच्या अचडणी वाढण्याची शक्यता आहे. 

काळजे यांना 29 जानेवारी 2012 रोजी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने वैधता प्रमाणपत्र दिले आहे. खेडेकर यांनी या जात प्रमाणपत्राला आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य शासन व जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला प्रतिवादी करण्यात आले आहे. 

खेडेकर यांनी वकिलामार्फत नितीन काळजे यांना यासंदर्भातील नोटीस पाठवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.