चिंचवड विधानसभा विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षपदी ललित म्हसेकर

एमपीसी न्यूज  – भारतीय जनता  पक्षाच्या वतीने चिंचवड विधानसभा विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षपदी ललित म्हसेकर यांची निवड करण्यात आली. आमदार लक्ष्मण जगताप यांनी निवडीचे पत्र दिले.


यावेळी ललित म्हसेकर म्हणाले, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षाचा अधिक विस्तार करुन दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडेन. पक्षाचे ध्येय विचार व धोरणे तसेच केंद्र व राज्य सरकारचे काम व विचार समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न करेन. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.