मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने ‘आरोग्याची निगा’ विषयावर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज –  मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने पिंपळे गुरव येथील बाल संस्कार केंद्रामधील मुलांना  आरोग्याची निगा याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. बालवाडी विभाग तथा जिल्हा सहाय्यक आयुक्त संजीवनी मुळे यांनी आरोग्याची निगा कशाप्रकारे राखावी याचे मार्गदर्शन मुलांना केले.

या कार्यक्रमाचे उदघाटन संजीवनी मुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  मराठवाडा जनविकास संघ अध्यक्ष अरुण पवार हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी समाजप्रबोधनकार शारदा  मुंडे,  माजी सैनिक जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष बळवंत कुमकर , सामाजिक कार्यकर्त्या  आदिती निकम , विजयराज नागरी सहकारी पतसंस्था सचिव सूर्यकांत कुरुलकर , गौरीशंकर किणीकर, दत्तात्रय धोंडगे , संजय सूर्यवंशी, योगिता खापेकर, विशाल खुने  आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिती निकम यांनी केले. आभार गौरीशंकर किणीकर यांनी मानले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.