सर्वाधिक वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा रविवारी विशेष सन्मान सोहळा

झंवर परिवारातर्फे रामेश्वर झंवर आणि पुष्पाबाई झंवर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – झंवर परिवारातर्फे रामेश्वर झंवर आणि पुष्पाबाई झंवर यांच्या स्मरणार्थ रविवार, दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 3.30  यावेळेत शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू कार्यालय येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुण्यामधील सर्वाधिक वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक शाम झंवर यांनी दिली.   

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जुगल राठी, कैलास झंवर, गणेश झंवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष आहे. रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड, सारंग यादवाडकर, बाबा पंडित, गोपाळ लोया या सर्वाधिक वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सन्मान सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.

रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब आॅफ खडकी, पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ जिल्हा युवा समिती, अलायन्स क्लब आॅफ पूना, श्री बालाजी भजनी मंडळ, राधाकृष्ण मंदिर युवा समिती या संस्थांचा उपक्रमात सक्रिय सहभाग असणार आहे. सन्मान सोहळ्यापूर्वी संचेती हॉस्पिटलचे फिजिओथेरपिस्ट डॉ. अपूर्व शिंपी यांचे गडघेदुखी व कमरेची काळजी याविषयावरील व्याख्यान सकाळी 10 वाजता होणार आहे. तसेच नेत्रदान जनजागृतीचे व नेत्रदान अर्ज भरणे हा उपक्रम अलायन्स क्लब आॅफ पूनातर्फे राबविण्यात येणार आहे.

गणेश झंवर म्हणाले, रक्तदान शिबिराप्रमाणेच आम्ही अनेक उपक्रम राबवितो. माहेश्वरी समाजातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले. तर त्या व्यक्तिबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता शाल अर्पण करण्याची प्रथा आहे. यामुळे अनेकजण शाल अर्पण करतात. परंतु कैलास झंवर यांनी या शाली एकत्र करुन समाजातील गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. मागील 9 वर्षांपासून सुमारे 3 हजार गरजूंपर्यंत पोहोचविल्या आहेत. कोठेही निधन झाले, तर कैलास झंवर येथे जातात आणि शाली देण्याचे आवाहन करतात. यामुळे हजारो गरजूंना शाली मिळाल्या आहेत.

"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.