धुळ्यातील डॉक्टर मारहाणीच्या निषेधार्थ पिंपरीतील दवाखाने, रुग्णालये आज बंद

एमपीसी न्यूज – उपचाराला उशिर झाल्याचे कारण देत धुळे जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना 14 मार्च रोजी घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवडमधील दवाखाने आणि रुग्णालये बंद ठेवण्यात आली आहेत.

शत्रुघ्न शिवाजी लष्कर हा 20 वर्षांचा तरुण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता. मात्र त्याच्यावर उपचार करण्यास दिरंगाई केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टर रोहन मामुनकर यांना जबर मारहाण केली, तसेच ऑपरेशन थिएटरचीही तोडफोड केली होती.

त्यामुळे राज्यभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 407 रुग्णालये आणि 1150 दवाखाने बंद ठेवण्यात आली आहेत, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र तातडीची सेवा सुरु ठेवण्यात आले आहे.
"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.