शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

मोशीत विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे लाईनमनला मारहाण

एमपीसी न्यूज – बिल थकल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित केलेल्या लाईनमनला घरमालकाने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.17) दुपारी पावणेदोनच्या सुमारास प्राधिकरण, मोशी येथे घडली.

सुभाष श्रीमंगल शर्मा (रा. स्वराज हाऊसिंग सोसायटी, मोशी, प्राधिकरण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुहास ढेंगळे (वय 32, रा. मोशी) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सुहास ढेंगळे मोशीतील महावितरणच्या कार्यालयात लाईनमन म्हणून नोकरी करत आहेत. शर्मा यांच्याकडे विद्युत बिल थकले आहे. त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार ढेंगळे यांनी शुक्रवारी शर्मा यांचा घरचा विद्युत पुरवठा खंडित केला.

त्यामुळे चिडलेल्या शर्मा यांनी ढेंगळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. ते करत असत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. भोसरी, एमआयडीसी ठाण्याचे फौजदार एम.आर. निकम तपास करत आहे.

spot_img
Latest news
Related news