भुशी धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भुशी धरणाच्या वरील बाजुला असलेल्या धबधब्यात पाय घसरून पडल्याने पुण्यातील एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

संतोष सोनकांबळे (वय 23, रा. हडपसर, मूळ अक्कलकोट), असे या युवकाचे नाव आहे. 

संतोष हा त्याच्या चार ते पाच मित्रांसमवेत भुशी धरण परिसरात फिरायला आला होता. पुण्यातील एका कंपनीत तो कामाला होता. लोणावळा परिसरातील भुशी धरण व धरणाच्या वरील बाजुला डोंगरातील धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. धरण परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. डोंगरातील धबधब्यात मित्रांसमवेत संतोष हा वर्षाविहाराचा आनंद घेत खेळत असताना पाय घसरून दगडावर पडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला.

यावर्षी लोणावळा परिसरात झालेली ही पहिलीच दुदैवी घटना आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.