निगडी येथे नाल्यात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक

एमपीसी न्युज- निगडी प्राधिकरण येथील एका नाल्यात अंदाजे 5 महिन्याचे स्त्री अर्भक मयत अवस्थेत आज सायंकाळी सातच्या सुमारास आढळले.

निगडी प्राधिकरण येथील सहयाद्री कॉलोनीतील सुर्वे गिरणी जवळील नाल्यात एक अर्भक पडल्याचे एका महिलेच्या निदर्शनास आले. तिने जवळ जाऊन पाहताच तिची खात्री पटली. तिने तातडीने निगडी पोलीस ठाण्यात धाव घेतली व अर्भकाबद्दल सांगितले.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यानी ते अर्भक ताब्यात घेतले. अर्भक एक दगडात अडकले होते. प्राथमीक दृष्ट्या ते वाहून आले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

शवविच्छेदनासाठी अर्भक वायसीएम रुग्णालयात पाठवले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.