Repeater Exam : दहावीची 22 तर, बारावीची 16 सप्टेंबरपासून पुरवणी परीक्षा ; वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा 22 सप्टेंबरपासून, तर बारावीची परीक्षा 16 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहेत. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द केल्या होत्या. व अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. तरीही काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची आता  लेखी परीक्षा होणार आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होईल. त्याचप्रमाणे बारावीची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत परिक्षा होईल.

व्यवसाय अभ्यासक्रम घेऊन बारावीची परीक्षा 16 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होईल. तत्पूर्वी, दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत होईल. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी मंडळाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.