Bhosari News : मेफेड्रोन ड्रग्ज विक्री प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज – मेफेड्रोन ड्रग्ज विक्री प्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ड्रग्ज आणि रोख रक्कम असा एकूण 47 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

योगेश श्रीकांत हराळीकर (वय 21, रा. चिंचवडेनगर, चिंचवड), इम्रान तन्वीर शेख (वय 24, रा. खडकी, पुणे), प्रशांत बापू पाटील (वय 22, रा. बिजलीनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई सागर भोसले यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी भोसरी पोलिसांना माहिती मिळाली की, भोसरी गावजत्रा मैदानाजवळ काहीजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी गावजत्रा मैदान परिसरात स्मशानभूमीजवळ सापळा लावला. तीन संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 46 हजार 800 रुपयांचे 11.700 ग्रॅम मेफेड्रोन (एम डी) ड्रग्ज आणि 900 रुपये रोख रक्कम असा एकूण 47 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी हे ड्रग्ज विक्रीसाठी आणले असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलीस उपनिरीक्षक भवारी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.