Yerawada – गांजा विक्रिसाठी आलेल्या महिलेकडून 250 ग्रॅम गांजा जप्त

एमपीसी न्यूज – गांजा विक्रिसाठी येरवडा येथील कंजारभाट वस्ती श्रीकृष्ण मंदिरासमोर आलेल्या महिलेकडून 250 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई काल गुरूवारी(दि.1) दूपारी करण्यात आली. चमेलीबाई पदेडीयासिंग बाटुंगे (वय 65, रा. कंजारभट वस्ती) असे गांजा विक्रि करणा-या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरात पोलीस गस्त घालत असताना पोलीस नाईक मनोज कुदळे यांना त्यांच्या बातमीदारमार्फत कंजारभाट वस्ती श्रीकृष्ण मंदिरासमोर  एक महिला  पिशवीमध्ये गांज्याच्या पुड्या विकण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती  मिळाली.त्याप्रमाणे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला व तिथे  गांज्याच्या पुड्या विकण्यासाठी आलेल्या महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या महिलेकडून तब्बल 4 हजार 220 रूपये किंमतीचा 250 ग्रॅम गांजा जप्त केला. ही कामगीरी  पोलीस उप आयुक्त प्रसाद अक्कानवरू, सहाय्यक पोलीस आयुक्त गावडे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिनकर मोहिते, पोलीस निरिक्षक बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गवारी. बाळासाहेब बहिरट, हणमंत जाधव, अजिज बेग, नागेश कुंवर, मनोज कुदळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.