Narcotics News : तळोजा येथील कारखान्यात नष्ट केले 410 कोटींचे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस

एमपीसी न्यूज – मुंबई सीमाशुल्क विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (Narcotics News ) तळोजा येथे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस यासारखे अंमली आणि मनावर परिणाम करणारे नशा आणणारे 54.850 किलो पदार्थ (एनडीपीएस), नष्ट केले. अंमली पदार्थ  नष्ट करण्याची मोहीम, मुंबई सीमाशुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश  असलेल्या मुंबई सीमाशुल्क  क्षेत्र -I, सीबीआयसीच्या उच्चस्तरीय अंमली पदार्थ नष्ट समितीसमोर राबवण्यात आली.

Railway : रेल्वेने मागील पाच वर्षात दिल्या सुमारे तीन लाख नोकऱ्या

नवी मुंबईतील तळोजा येथील घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा (सीएचडब्लूटीएसडीएफ), एमडब्ल्यूएमएल (Narcotics News ) येथे हे अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची अवैध बाजारपेठेतील किंमत सुमारे 410 कोटी रुपये आहे.

या वर्षभरात अंमली पदार्थ नष्ट करण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा 2 मार्च 2023 रोजी अंदाजे 240 कोटी रुपये किंमतीचे 61.585 किलो आणि 19 जुलै 2023 रोजी दुसऱ्यांदा अवैध बाजारात 865 कोटी रुपये किंमतेचे 128.47 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
अशा प्रकारे, या वर्षात 1515 कोटी रुपये किंमतीचे एकूण 244.905 किलो अंमली पदार्थ नष्ट  करण्यात आले. विशेष तपास आणि गुप्तचर शाखा (एसआयआयबी) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांसारख्या विविध संस्थांनी हे अंमली पदार्थ जप्त केले (Narcotics News ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.