Pimpri : सोसायटीधारकांच्या समस्या-आव्हानांवर होणार ‘मंथन’

सोसायटीधारकांसाठी महास्नेहसंमेलन

एमपीसी न्यूज – चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या (Pimpri ) माध्यमातून येत्या शनिवारी, दि. 16 साधुराम गार्डन मंगल कार्यालय, नाशिक- पुणे हवे, साईनाथ हॉस्पिटल समोर मोशी या ठिकाणी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सोसाट्यांमधील सर्व सदस्यांसाठी महास्नेहसंमेलन आयोजित केलेले आहे. यामध्ये सोसायटीधारकांच्या समस्या-आव्हानांवर  ‘मंथन’होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सहा हजाराहून अधिक सहकारी गृह रचना संस्था आहेत. या सर्व सहकारी गृह रचना संस्थांना अनेक अडचणींना, समस्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व आव्हानांबाबत साधक-बाधक चर्चा करण्यासाठी तसेच सोसायटी फेडरेशनची सोसायट्यांसमोरील आव्हान, समस्या बाबत फेडरेशनची असणारी भविष्यातील भूमिका याबाबत फेडरेशन मार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सोसायटीधारकांना एकसंघ करून सर्व सोसायटी धारकांच्या ऐक्यासाठी (Pimpri ) भविष्यामध्ये मार्गक्रमण करत असताना करावयाच्या नियोजनाबाबत सदर महास्नेहसंमेलन मेळाव्यामध्ये चर्चा आणि दिशा ठरवण्यात येणार आहे, अशी माहिती चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिली.

Narcotics News : तळोजा येथील कारखान्यात नष्ट केले 410 कोटींचे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस

महास्नेहसंमेलन हे सर्व सोसाट्यांमधील सर्व सदस्यांसाठी त्यामध्ये लहान मुले, महिला भगिनी, ज्येष्ठ सदस्य,इतर सर्व सदस्य या सर्वांसाठी हे स्नेहसंमेलन असणार आहे. सदर महास्नेहसंमेलनामध्ये सर्व सदस्यांसाठी करमणूक म्हणून गाण्यांचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आलेला आहे. लहान मुलांसाठी खेळण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व उपस्थित सदस्यांसाठी रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केलेली आहे.

तसेच सदर महास्नेहसंमेलनासाठी उपस्थित असणाऱ्या सोसायटी धारकांच्या विविध समस्या मांडण्यासाठी एक ड्रॉप बॉक्स या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये परिसरातील सदस्य आपल्या भागातील अडी अडचणी समस्या ठेवू शकतात. यावर या महास्नेहसंमेलनानंतर पाठपुरावा करून या सर्व समस्या सोडवल्या जातील. शहरातील सर्वच सोसायटीमधील सर्व सदस्यांनी सदर फेडरेशनच्या महास्नेहसंमेलनास उपस्थित राहावे, असे फेडरेशन कडून आव्हान करण्यात येत आहे.

सर्व सोसायटीधारकांना एकत्र करून एका छताखाली आणणे. सर्वांना एकत्र करून आपल्या सर्वांच्या समोर असणारी अनेक आव्हाने अडचणी,समस्या याबाबत सर्वांना मार्गदर्शन आणि आपल्या फेडरेशनची भविष्यात असणारी भूमिका या महा स्नेहसंमेलनात जाहीर केली जाणार आहे.

सर्व सोसायट्यांमधील सर्व सदस्यांना सहकुटुंब सहपरिवार एकत्र आणून विचाराची देवाण-घेवाण आणि सहपरिवार आनंद साजरा करणे हा या महासंमेलनाचा उद्देश आहे. तरी माझी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसायटीधारकांना  विनंती आहे आपल्या सर्वांच्या ऐक्यासाठी, आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी आपण सर्वानी या महास्नेहसम्मेलनास सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित रहावे, असे आवाहन सांगळे यांनी केले.

शहरांमधील बऱ्याच सोसायट्यांमधे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे सदस्य राहतात, त्यामध्ये वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, व्यावसायिक, शास्त्रज्ञ असे प्रतिभा असणारे सदस्य आपल्या सर्व सोसायट्यांमधे  आहेत. या सर्वांना एकत्र करून या सर्वांच्याकडे असणाऱ्या प्रतिभेचा, कौशल्याचा आपल्या सर्व सोसायटीधारकांना कसा फायदा करून घेता येईल आणि आपल्या सर्वांची कसे प्रगती करता येईल. याबाबत या महा स्नेहसंमेलनामध्ये चर्चा विनिमय करण्यात येणार आहे असल्याचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. प्रताप बामणे यांनी (Pimpri ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.