ST News : एसटी महामंडळ कात टाकणार; इलेक्ट्रिक बसच्या पदार्पणानंतर पाच हजार बस एलएनजीवर धावणार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST News) ताफ्यात सध्या सुमारे 15 हजार बसेस आहेत. त्यापैकी पाच हजार बसेस एलएनजी मध्ये (लीक्विफाईड नॅचरल गॅस) रुपांतरीत केल्या जाणार आहेत. त्याबाबत निविदा काढण्यात आल्या असून पुढील काही महिन्यांमध्ये या बसेस नॅचरल गॅसवर धावायला सुरुवात होणार आहे. सध्या चालणाऱ्या डीझेल गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणात नॅचरल गॅसवरील गाड्यांमुळे घट होणार आहे.

एसटीने पर्यावरण पूरक धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार एसटीच्या ताब्यात इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. पुढील दोन वर्षात पाच हजार 150 इलेक्ट्रिक बसेस आणखी दाखल होणार आहेत. या बसेस तयार करण्याचे काम सुरु आहे. पुढील काही दिवसात त्यातील 20 बसेस दाखल होत आहेत. राज्यात इलेक्ट्रिक बस चार्जिंग करण्यासाठी 71 ठिकाणी चार्चींग स्टेशन उभारण्यात आले आहेत.

Narcotics News : तळोजा येथील कारखान्यात नष्ट केले 410 कोटींचे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस

इलेक्ट्रिक बससाठी 101 ठिकाणी डेपो आणि चार्जिंग स्टेशन असतील. तिथे इलेक्ट्रिक बसची दुरुस्ती केली जाईल. यामध्ये दोन प्रकारच्या बस असतील 9 मीटर लांबीच्या (ST News) बसची प्रवासी क्षमता 34 असून ही बस एका चार्जिंगमध्ये 200 किलोमीटर धावेल. तर 12 मीटर लांबीच्या बसमध्ये 44 प्रवसी बसू शकतील. ही बस एका चार्जिंगमध्ये 300 किलोमीटर धावेल.

इलेक्ट्रिक बस वातानुकुलीत असणार आहेत. वातानुकुलीत इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात आल्यानंतर ग्रामीण भागातील प्रवाशांना देखील याचा फायदा होणार आहे. या बसेसचे भाडे ठरविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती अभ्यास करून इलेक्ट्रिक बसचे भाडे ठरवणार आहे.

एसटी महामंडळाकडे असलेल्या 15 हजार बस गाड्यांपैकी पाच आजार बस डीझेलमधून एलएनजीमध्ये रुपांतरीत केल्या जाणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया देखील राबवण्यात आली आहे. नॅचरल गॅसवर धावणाऱ्या बसेसमध्ये गॅस भरण्यासाठी 90 ठिकाणी डेपो होणार आहेत. सुमारे सात ते आठ वर्ष झालेल्या बस गाड्यांचे एलएनजीमध्ये रुपांतरण होणार आहे. प्रवाशांसाठी दिलासादायक बाब अशी की, नॅचरल गॅसवर धावणाऱ्या बसचे तिकीट दर सध्याच्या दरानुसार असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.