Pune : पुणे लोहमार्ग पोलिसांनी केले सव्वासहा कोटींचे अमली पदार्थ नष्ट

एमपीसी न्यूज- पुणे लोहमार्ग पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेला, तसेच (Pune) न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणातील तब्बल एक हजार किलो गांजा आणि सात किलो 896 ग्रॅम चरस पोलिसांनी नष्ट केला. या अमली पदार्थांची किंमत सहा कोटी 25 लाख रुपये इतकी आहे.

पुणे लोहमार्ग पोलिसांच्या पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि सोलापूर येथील पोलिस पथकांनी 1992  पासून आत्तापर्यंत अमली पदार्थ तस्करांच्या विरोधात कारवाई केली.

या 47 गुन्ह्यांमध्ये दीड हजार किलो गांजा आणि चरस अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर 29 गुन्ह्यातील गांजा आणि चरस नष्ट करण्याची परवानगी मिळाली.

Maharashtra : साखर कारखाना उभारणीसाठी 25 किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करणार- एकनाथ शिंदे

त्यानुसार पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या समितीने खडकी मुख्यालयातील अमली पदार्थांचा पंचनामा केला.

त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी अमली पदार्थ रासायनिक विश्लेषण तज्ज्ञ, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि वजन- मापे विभागातील अधिकाऱ्यांसमोर अमली पदार्थ भट्टीत जाळून नष्ट करण्यात (Pune) आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.