Maharashtra : साखर कारखाना उभारणीसाठी 25 किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करणार- एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज-साखर कारखाना उभारणीसाठी (Maharashtra) सध्या असलेली 25 किलोमीटर हवाई अंतराची अट  शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी दिली. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत  यांनी 22 मे 2023 रोजी राज्यातील शेतकरी शेतमजूर, ऊस वाहतूकदार, सरपंच परिषद यांच्या विविध प्रश्नांवर ‘वारी शेतकऱ्यांची’ अशी पायी यात्रा काढली होती.

त्या अनुषंगाने राज्यातील शेतकरी, ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत  अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

Today’s Horoscope 16 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडी बाजार ही योजना सुरु करावी असे सांगितले.

तसेच  ऊस वाहतूकदारांची ऊसतोड मजूर पुरवठादार मुकादमाकडून होणाऱ्या फसवणुकींवर गुन्हे दाखल झालेल्या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी ,असे आदेश दिले.

सरपंच परिषदेच्या मागण्यांबाबत ग्रामविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घेण्यात येईल  हे देखील यावेळी निश्चित करण्यात आले.

शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शेती पूरक व्यवसायाला ‘सिबील’ निकष लावू नये. याबाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती एसएलबीसी या बैठकीत हा विषय घेऊन तो मार्गी लावणार असल्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तसेच तुकडा बंदी कायदा रद्द करून शेतकऱ्यांना गुंठ्याने जमीन विक्री करण्यास परवानगी देणेबाबतचा कायदा लवकरच अंमलात आणण्याचे आदेश (Maharashtra) त्यांनी दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.