Cyclone Biperjoy : बिपरजॉय चक्रीवादळ वळले राजस्थानच्या दिशेने

एमपीसी न्यूज- अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी (Cyclone Biperjoy) सायंकाळी गुजरात किनाऱ्यावर धडकल्यानंतर आता  राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. येथील वाऱ्याचा वेग ताशी 75 ते 85 किलोमीटर इतका आहे.या भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे त्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी गुजरात किनाऱ्यावर धडकले. कच्छच्या जखाव बंदर भागात या चक्रीवादळाचा भूस्पर्श होण्याची प्रक्रिया गुरुवारी सायंकाळी सुरू झाल्यानंतर ती मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिली.

Pune : पुणे लोहमार्ग पोलिसांनी केले सव्वासहा कोटींचे अमली पदार्थ नष्ट

त्या भागात  ताशी सुमारे शंभर किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा तसेच त्यासोबत सुरू झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा या भागाला बसला. गुजरातमध्ये बिपरजॉय धडकल्यानंतर मोठं नुकसान झालं आहे.

गुजरातशिवाय आणखी चार राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली (Cyclone Biperjoy)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.