अभाविपचा 27 फेब्रुवारीला शनिवारवाडा ते विधानभवनावर छात्र क्रांती मोर्चा

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शैक्षणिक समस्यां विरोधात 27 फेब्रुवारीला शनिवारवाडा ते विधानभवन छात्र क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत अभविपचे प्रदीप गावडे यांनी दिली.

 

या विषयी गावडे म्हणाले की, सद्य स्थितीला शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक समस्येला तरुण वर्गाला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सरकारी नोकर भरतीवरील बंदी त्वरित उठविण्यात यावी. भरतीसाठी प्रतिक्षा यादी लावण्यात यावी. तलाठी भरती परीक्षा एमपीएससी मार्फत मोफत घेण्यात यावी. राज्यशासन आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात 100 अभ्यासिका सुरू करण्यात याव्या.

 

त्याचबरोबर पुण्यात 15 शासकीय वसतिगृहे लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. तसेच त्यातील वसतिगृहे यूपीएससी आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्या गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी असावीत. या मागण्यांसाठी 27 फेब्रुवारीला शनिवारवाडा ते विधानभवन शैक्षणिक समस्या विरोधात छात्र क्रांती मोर्चा काढला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.