Chikhali : मोबाईल दुकानातून पाऊण लाखांचे मोबाईल फोन चोरीला

एमपीसी न्यूज – छताचा पत्रा उचकटून चोरटयांनी 72 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 26) सकाळी आकाराच्या सुमारास कुदळवाडी येथील देहू-आळंदी रस्त्यावर न्यू सागर कम्युनिकेशन्स मोबाईल शॉपीमध्ये उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_II

राहुल गोपीचंद वाधवानी (वय 30, रा. किनारा कॉलनी, काळेवाडी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाधवानी यांचे कुदळवाडी परिसरात यू सागर कम्युनिकेशन्स नावाने मोबाईल दुकान आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा व सिलिंग उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील एकूण 72 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेले. बुधवारी सकाळी वाधवानी यांनी दुकान उघडले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.