Pimpri : देहूगावात 300 आयुर्वेदिक झाडांचे वृक्षारोपण

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण आणि मॉडर्न हायस्कूल यमुनानगरचा उपक्रम

एमपीसी न्यूज – देहूगावमधील गाथाग्राम येथे 27 प्रकारच्या 300 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण आणि मॉडर्न हायस्कूल यमुनानगर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार शहा, युथ डायरेक्टर दीपा जावडेकर आणि क्लबचे सदस्य यावेळी उपस्थित होते. मॉडर्न हायस्कूल यमुनानगर या शाळेच्या 100 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. चिंच, कडुलिंब अशा विविध 27 प्रकारच्या 300 रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले.

देहूगावमधील गाथाग्राम येथे जैवविविधता उद्यान आहे. या उद्यानात अनेक प्रकारची झाडे आहेत. मात्र, त्यामध्ये जंगली झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आयुर्वेदाचे महत्व समाजाला अलीकडच्या काळात प्रकर्षाने समजत आहे. आयुर्वेद हा मनुष्याला तारणारा आहे. त्यामुळे आयुर्वेदाचे जतन होणे ही काळाची गरज आहे. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आणि नष्ट होणारी जंगले यामुळे आयुर्वेदातील अनेक औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी एक प्रयत्न म्हणून रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने हा उपक्रम राबवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.