डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत असोसिएशन पूना सोशलची जॉली रेंज हिल्स संघावर 4-0 ने मात

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) आयोजित डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात असोसिएशन पूना सोशल संघाने  जॉली रेंज हिल्स संघाचा 4-0 असा पराभव करून आगेकूच केली. 

पीडीएफएच्या ढोबरवाडी येथील फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अ गटात असोसिएशन पूना सोशल संघाने जॉली रेंज हिल्स संघाचा 4-0 असा पराभव केला. विजयी संघाकडून सुफियान शेख (16,42मि.)याने दोन गोल, तर विनय कमाने व याकूब सय्यद यांनी प्रत्येकी एक गोल केला. 

बी गटात टायगर्स कम्बाईन व घोरपडी यंग वन्स यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. अशोक एफसी संघाने इलान संघाला बरोबरीत रोखले.  

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 

गट ब: टायगर्स कम्बाईन: 0 बरोबरी वि.घोरपडी यंग वन्स: 0;
गट ब: अशोका एफसी: 0 बरोबरी वि.इलान: 0;
गट ब: डेक्कन रोव्हर्स ड: 0 बरोबरी वि.कमांडोज अ: 0;
गट अ: असोसिएशन पूना सोशल: 4 (सुफियान शेख 16,42,मि., विनय कमाने 24 मि., याकूब सय्यद 62 मि) वि.वि.जॉली रेंज हिल्स: 2 (डेनिस दास 9 मि., ख्रिस्ती दास 35 मि).     

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.