शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

महिला न्यायाधीशांच्या बँकेची गोपनीय माहिती चोरून 47 हजारांची लूट

डेक्कन पोलिसात तक्रार दाखल

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर न्यायालयातील 46 वर्षीय महिला न्यायाधीशांच्या बँकेची गोपनीय माहिती चोरून 47 हजार रुपये लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

डेक्कन पोलिस ठाण्यात याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला आहे. या महिला न्यायाधीशाचे एफसी रोड वरील अॅक्सिस बँकेत खाते आहे.

याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान न्यायाधीशाचीच फसवणूक झाल्याने शिवाजीनगर न्यायालयात सध्या याची चर्चा सूरु आहे.

spot_img
Latest news
Related news