Maharashtra : महिलांना आजपासून अर्ध्या किंमतीत एसटी प्रवास; आदेश जारी

एमपीसी न्यूज : राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अनेक घोषणा केल्या. यातील महत्वाची म्हणजे, महिला सन्मान योजना असून या अंतर्गत एसटी प्रवासात 50 टक्के सवलत हा महत्वाचा निर्णय होता. याची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. (Maharashtra) दरम्यान राज्य सरकारने याबाबतचचा अध्यादेश काढला असून आज पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आज पासून महिला 50 टक्के सवलतीचा लाभ घेऊ शकणार आहेत.

 

राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पांत महिला सन्मान योजना जाहीर केली. या योजनेत महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. ही योजना लवकर लागू करण्याची मागणी होत होती.(Maharashtra) त्यानुसार आज पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याच्या या योजनेच्या अंमलबजवणीला सुरुवात होणार आहे. ही रक्कम दरवर्षी राज्य शासन महामंडळाला देणार आहे.

 

CM Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला मोठं यश! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.

 

महिलांना ही सुविधा दिल्याने बहुधा प्रवास करणाऱ्या महिलांना याचा फायदा होणार आहे. काही महिला कामानिमित्त रोज प्रवास करतात, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.(Maharashtra) खासगी वाहनाने प्रवास करून जास्त पैसे खर्च करण्याऐवजी या महिला आता अर्ध्या तिकिटात एसटी बसने प्रवास करतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.