Pune : पुणे विभागातील 52 हजार 987 शिक्षकांनी बजावला मतदानाचा हक्क

दिवसभरात 73.04 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांसाठी मंगळवारी (दि. 1) मतदान झाले. 52 हजार 987 शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला. दिवसभरात 73.04 टक्के मतदान झाले.

सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 11.38 टक्के मतदान झाले. तर दुपारी बारा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढून 26.25 एवढी झाली. तर दुपारी दोन वाजेपर्यंत ही टक्केवारी 54.03 टक्के एवढी झाली. दुपारी चार वाजेपर्यंत 67.36 टक्के मतदान झाले. तर पाच वाजेपर्यंत 73.04 टक्के मतदान झाले.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पाच जिल्ह्यात 45 हजार 194 पुरुष तर 27 हजार 327 महिला मतदार आहेत. त्याचबरोबर 24 तृतीयपंथी शिक्षक मतदार आहेत. यातील 36 हजार 371 पुरुष तर 16 हजार 615 महिला मतदारांनी मतदान केले आहे. पुणे जिल्ह्यातील एका तृतीयपंथी शिक्षकाने मतदान केले. एकूण 72 हजार 545 शिक्षक मतदारांपैकी 52 हजार 987 शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

जिल्हावार झालेले मतदान –

पुणे (एकूण – दिवसभरात झालेले मतदान)
पुरुष – 15807 – 10705
महिला – 16371 – 8143
तृतीयपंथी – 23 – 1
एकूण – 32201 – 18849 (58.54 टक्के)

सातारा (एकूण – दिवसभरात झालेले मतदान)
पुरुष – 5121 – 4386
महिला – 2589 – 1934
तृतीयपंथी – 1 – 0
एकूण – 7711 – 6320 (81.96 टक्के)

सांगली (एकूण – दिवसभरात झालेले मतदान)
पुरुष – 4826 – 4117
महिला – 1986 – 1534
तृतीयपंथी – 0 – 0
एकूण – 6812 – 5651 (82.96 टक्के)

सोलापूर (एकूण – दिवसभरात झालेले मतदान)
पुरुष – 10561 – 9187
महिला – 3023 – 2371
तृतीयपंथी – 0 – 0
एकूण – 13584 – 11558 (85.09 टक्के)

कोल्हापूर (एकूण – दिवसभरात झालेले मतदान)
पुरुष – 8879 – 7976
महिला – 3358 – 2633
तृतीयपंथी – 0 – 0
एकूण – 12237 – 10609 (86.70 टक्के)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.