Pune : खासदार अनिल शिरोळे आणि संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या

मराठा क्रांती मोर्चा ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस

एमपीसी न्यूज- राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परळीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या घर, कार्यालयासमोर मराठा आंदोलन ठिय्या देऊन घोषणाबाजी करत आहेत.

आज तिसऱ्या दिवशी लोकसभा खासदार अनिल शिरोळे आणि राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत आपल्या मागण्या मांडल्या आहेत. यावेळी संजय काकडे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारत आपण मराठा आरक्षण मिळावा म्हणून प्रयत्न करत असल्याचे आंदोलकांना सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.