Pimpri : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा उभे करणार हजारो उमेदवार

एमपीसी न्यूज – सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाची (Pimpri )प्रचंड फसवणूक केली. याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा लोकसभेच्या मावळ, शिरूर, बारामती व पुणे मतदार संघात हजारो उमेदवार उभे करणार असल्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची रविवारी (दि. 10) चिंचवडगाव येथे बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीसाठी मारुती भापकर, मनोहर वाडेकर, प्रकाश जाधव, सतीश काळे, (Pimpri )जीवन बोराडे, धनाजी येळकर, नकुल भोईर, वैभव जाधव, वसंत पाटील, संजय जाधव, अभिषेक म्हसे, सचिन पवार, शिवाजी पाडुळे, गणेश देवराम, ब्रह्मानंद जाधव, अमोल ढोरे, भाऊसाहेब ढोरे, सतीश शेलार, संदीप नवसुपे, ओंकार देशमुख, मोहन पवार, राज साळुंखे,स्वप्नील परांडे आदी उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने सगेसोयरे बाबतची अधिसूचना काढून आंदोलन स्थगित करावयास लावले. त्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याचे वचन लाखो मराठा आंदोलकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले 16 फेब्रुवारी पर्यंत यावर हरकती मागवण्यात आल्या. त्याची मुदत संपून तीन आठवडे झाले, तरी महाराष्ट्र सरकारने सदर सगेसोयरे बाबतच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर केले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी येत्या चार दिवसात सदर अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कमीत कमी एक हजार उमेदवार उभे करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आजवर गप्प बसलेल्या पंतप्रधानांचे लक्ष वेधणार असल्याचे या बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आले.
तसेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात व पुणे जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सह सर्व मंत्र्यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
लोकसभेसाठी ग्रामीण भागातील प्रत्येक गावातून व शहरी भागातील प्रत्येक प्रभागातून किमान दोन उमेदवार उभे करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. त्यासाठी ज्यांना ज्यांना उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा आहे त्या व्यक्तींनी शिरूर लोकसभेसाठी मनोहर वाडेकर, आतिश मांजरे, जीवन बोराडे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सतीश शेलार, अमोल ढोरे, भाऊसाहेब ढोरे, मारुती भापकर, प्रकाश जाधव, धनाजी येळकर, शिवाजी पाडुळे, सतीश काळे, गणेश देवराम, अभिषेक म्हसे, सचिन पवार, नकुल भोईर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.