Pimpri: राहण्यायोग्य शहरात औद्योगिकनगरी पिछाडीवर; 69 वा क्रमांक

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने रहाण्यायोग्य असलेल्या शहरांच्या केलेल्या पाहणीत पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर गेले आहे. औद्योगिकनगरीचा तब्बल 69 वा क्रमांक आला आहे.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने ‘जीवनशैली निर्देशांक’ उपक्रमासाठी देशातील 116 शहरांची निवड केली होती. त्यात महाराष्ट्रातील 18 शहरांचा समावेश होता. निवड झालेली शहरे 10 लाख लोकसंख्याच्या पुढील होती. या स्पर्धेसाठी एकूण 79 निर्देशांक विचारात घेतले गेले. त्यामध्ये शहराची सामाजिक, सांस्कृतिकस शैक्षणिक, सुरक्षितता, अर्थव्यवस्था, रोजगार संधी, सार्वजनिक मैदाने, जमिनींचा वापर, कचरा व्यवथापन अशा 15 महत्वांच्या मुद्यावर तपासणी करुन सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने रहाण्यायोग्य असलेल्या देशातील शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पुणे सुखावह जगण्यासाठी सगळ्यात चांगले ठिकाण असून पहिल्या क्रमांकावर आहे. तर, पिंपरी-चिंचवडने 69 वा क्रमांक मिळविला आहे.

   

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.