Lonavala : एक्सप्रेस वेवर आॅईल सांडल्याने वाहतूक विस्कळीत

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खोपोली गावाच्या हद्दीत बोरघाटातील उतारावर साखरेचा ट्रक उलटून आॅईल रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पहाटेच्या सुमारास किमी 37 जवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने निघालेला साखरेचा ट्रक मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून उलटल्याने हा अपघात झाला.

यामध्ये कोणी जखमी नसले तरी अपघातानंतर रस्त्यावर आॅईल पसरल्याने वाहने संथगतीने जात होती. यामुळे काहीकाळ एक्सप्रेस वेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग व खोपोली पोलीस तसेच आयआरबी पथक व अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी आॅईलवर माती टाकत वाहतूक सुरु केली. अपघातग्रस्त ट्रक बाजुला करत सध्या संथगतीने वाहतूक सुरु आहे.

   

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.