Pune : डेबिट कार्डाची माहिती चोरून कॉसमॉस बँकेच्या खात्यांमधील 94 कोटी रुपये हॉंगकॉंगच्या बँकेत ट्रान्सफर

एमपीसी न्यूज – कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील अनेक खात्यांच्या डेबिट कार्डाची माहिती चोरून मधून अज्ञात व्यक्तीने तब्बल 94 कोटी रुपये हॉंगकॉंगच्या हान्सेन्ग बँकेत ऑनलाइन जमा करून काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील मुख्यालयात 13 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते रात्री 10 च्या दरम्यान घडला. या घटनेमुळे बँकिंग विश्वात खळबळ उडाली आहे. 

याबाबत सुहास गोखले (वय 53 रा. पिनॅक पारिजात कर्वेनगर ) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गणेश खिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच सर्व्हरवर अज्ञात मालवेअरचा हल्ला करून अनेक अनेक खातेधारकांच्या डेबिट कार्ड, रुपी कार्डाची ची माहिती चोरून त्याद्वारे 94 कोटी रुपये हॉंगकॉंगच्या हान्सेन्ग बँकेत ट्रान्सफर करून रक्कम काढल्याचे उघडकीस आले आहे.  यामध्ये अज्ञात व्यक्तीने व्हिसाचे 12 हजार व्यवहार करून 78 कोटी, 2 हजार 849 व्यवहार करून अडीच लाख असे एकूण 14 हजार 849 व्यवहार करून 80 कोटी 50 लाख रुपये, तसेच 13 ऑगस्ट रोजी साडेअकरा वाजता स्विफ्ट ट्रँजॅक्शन इनिशिएट करून 13 कोटी 92 लाख असे एकूण 94 कोटी 42 लाख रुपये हॉंगकॉंगच्या हान्सेन्ग बँकेत ऑनलाइन जमा करून तेथून त्वरित काढण्यात आल्याचे आढळून आले आहे.

चतुःशृंगी पोलीस तपास करीत आहेत.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.