Pune : भारती विद्यापीठाच्या ‘आयएमईडी’तर्फे शनिवारी ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट पार्टनरशीप समिट’

कार्पोरेट जगतातील 50 मान्यवरांचा होणार सन्मान

एमपीसी न्यूज- भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या’इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) तर्फे शनिवारी, (25 ऑगस्ट) ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट पार्टनरशीप समिट- 2018’ चे आयोजन केले आहे. भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थी, संस्था आणि उद्योजकीय जगातील मान्यवरांना एका व्यासपीठावर संवाद साधण्यासाठी या समिटद्वारे संधी दिली जाते. ‘व्यवस्थापन विद्यार्थ्यांची उद्योगासंबंधित अपेक्षा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे.

25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आयएमईडीच्या ‘अभिजीतदादा कदम ऑडिटोरियम’, एरंडवणे येथे ‘पायसो फिनटेक’चे सहसंस्थापक अंकीत भटनागर यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ‘क्लाउस मल्टिपार्किंग लि.’चे उपाध्यक्ष आल्हाद थत्ते , भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कार्यवाह विश्वजीत कदम हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी आयएमईडीच्या ‘प्लेसमेंट ब्रोशर’चे प्रकाशन होणार आहे. कार्पोरेट जगतातील 50 मान्यवरांची या समिटमध्ये उपस्थिती असणार आहे. उद्योग, व्यवस्थापन शास्त्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर गटचर्चा, खुली चर्चा देखील आयोजित करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.