Pune : ईद-उल-झुआ‘ निमित्त परदेशी विद्यार्थ्यांना विशेष शुभेच्छा

एमपीसी न्यूज- मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण मानल्या जाणार्‍या ‘ईद-उल- झुआ’ निमित्त पुण्यात राहणार्‍या परदेशी मुस्लिम विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम ‘हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट‘तर्फे आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम 21 ऑगस्ट (मंगळवार) रोजी सकाळी साडेसात वाजता आझम कॅम्पसमधील मशिदीत होईल. ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी‘चे व ‘आझम एज्युकेशन ट्रस्ट‘चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी ही माहिती दिली.

या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट, अत्तर देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.