Pune : जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासंबंधित समस्या व उपाय’ या विषयावर राज्यस्तरीय मेळावा

एमपीसी न्यूज- जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासंबंधित समस्या व उपाय’ या विषयावर राज्यस्तरीय मेळावा आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद’, ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ व ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 31) पुण्यात मनोहर मंगल कार्यालय येथे हा मेळावा होणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी सुरेश दोड्डमणी (उपाध्यक्ष, ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ’), मनीषा कोष्टी (सचिव, ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ’), अंकुश काकडे (पुणे म्हाडाचे माजी अध्यक्ष), शंकर भिडे (‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’), आदिती देशपांडे (संचालिका, सहकार भारती सहकार प्रशिक्षण संस्था, कराड) उपस्थित होते.

या मेळाव्याला शेखर चरेगावकर (अध्यक्ष,‘महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद’), खासदार अनिल शिरोळे, चंद्रशेखर प्रभू (मुंबई म्हाडाचे माजी अध्यक्ष), आर्किटेक्ट विश्‍वास कुलकर्णी, अविनाश महागावकर (सदस्य,‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’), अंकुश काकडे (पुणे म्हाडाचे माजी अध्यक्ष), सीताराम राणे (अध्यक्ष, ‘ठाणे, महाराष्ट्र डिस्ट्रीक्ट को-ऑप हौसिंग फेडरेशन’), छाया आजगावकर (अध्यक्ष, ‘मुंबई डिस्ट्रीक्ट को ऑप हौसिंग फेडरेशन’), अ‍ॅड व्ही डी कर्जतकर, अ‍ॅड. खुर्जेकर सहभागी होणार आहेत.

पुणे जिल्ह्यात सुमारे १६ हजार गृहनिर्माण संस्था असून, अनेक संस्थांनी त्यांचे पुनर्विकसन यशस्वीपणे केले आहे. काही संस्थांना अनेक कारणांमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. अंदाजे ४ ते ५ हजार गृहनिर्माण संस्थांना त्यांचे पुनर्विकसन करायचे आहे. या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मनीषा कोष्टी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.