Pune : घरकाम करणाऱ्या महिलेने एकाच घरातून तीन महिन्यात चोरले 30 तोळ्याचे दागिने

एमपीसी न्यूज- घरकाम करणाऱ्या महिलेने एका घरात काम करीत असताना थाेडे थाेडे करत तब्बल 30 ताेळे साेने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेला सिंहगडराेड पाेलिसांनी अटक केली असून तिच्याकडून चाेरीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

याप्रकरणी प्रिती गिरीधर करंदीकर (38) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकाम करणारी अाराेपी महिला ही करंदीकर यांच्याकडे स्वयंपाक करण्याचे काम करते. करंदीकर यांनी त्यांचे वडिलाेपार्जित दागिने कपाटात ठेवले हाेते, त्या कपाटाला त्या कुलूप लावायला विसरल्या हाेत्या. ही गाेष्ट माेलकरणीच्या लक्षात आल्यानंतर तिने मागील दाेन ते तीन महिन्यांपासून कपाटातून थाेडे थाेडे दागिने चाेरण्यास सुरुवात केली.

मंगळवारी करंदीकर या घर अावरत असताना त्यांना कपाटातील दागिने चाेरीला गेल्याचे निदर्शनास अाले. संबंधित माेलकरीण ही इतर ठिकाणी सुद्धा काम करत असल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांनीही त्यांच्या घरातील 7 ते 8 ताेळे दागिने चाेरीला गेल्याचे सांगितले. त्यामुळे माेलकरणीवर संशय वाढल्याने करंदीकर यांनी सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी माेलकरणीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने दागिने चाेरल्याची कबुली दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.