BNR-HDR-TOP-Mobile

चित्रपट “ मनमर्जीया….. हलके फुलके मनोरंजन

PST-BNR-FTR-ALL

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- प्रेम आणि प्रेमाचा त्रिकोण हे काही आता नवीन राहिलेलं नाही, प्रेम एका व्यक्तीवर आणि लग्न दुसऱ्या व्यक्तीबरोबर असे जरी असले तरी ह्या मध्ये सुद्धा एक प्रकारचे गहिरे प्रेम दडलेलं असते. अश्याच एका मनस्वी कल्पनेवर निर्माते आनंद एल राय, विकास बहल, मधु वर्मा, विक्रमादित्य मोटवाने, यांनी फैन्तोम फिल्म्स, कलर यलो प्रोडक्शन, इरोस इंटरनेशनल, या चित्रपट संस्थे तर्फे, “ मनमरजिया “ ह्या चित्रपटाची निर्मिती केली असून आनंद एल राय यांची प्रस्तुती लाभलेली आहे. दिग्दर्शन अनुराग कश्यप यांचे लाभले असून कथा कनिका धिल्लोन यांचे आहे, संगीत अमित त्रिवेदी यांनी दिलेलं आहे. यामध्ये अभिषेक बच्चन, तापसी पन्नू, विकी कौशल, आयुष्यमान खुराना, अशनुर कौर, सौरभ सचदेव, सुखमनी सदना, अब्दुल कादिर अमीन हे कलाकार आहेत.

ही कथा रुमी, विकी आणि रॉबी या व्यक्तिरेखांच्या भोवती फिरते, हा एक आगळा-वेगळा प्रेमाचा त्रिकोण आहे. रुमी आणि विकी यांचे एकमेकावर प्रेम असते, विकी हा रुमी शिवाय राहू शकत नाही. विकी हा गायक असून रुमी हि हॉकीपटू असून ती आता एका दुकानात कामाला आहे, एक दिवस रुमी आणि विकी यांना एका खोलीत त्यांचे प्रेम रंगात आलेले असताना त्यांना घरचे लोक रंगे हाथ पकडतात, आणि रुमी चे लग्न लाऊन देण्याचा निर्णय घेतात, विकी वर तिचे प्रेम असते ती त्याला आई-वडिलांना घेऊन ये आणि लग्नाचे ठरवून टाक असे सांगते नाहीतर माझे लग्न दुसऱ्या व्यक्तीबरोबर होईल असे सांगून टाकते पण विकी काही येत नाही त्यामुळे रुमी चे लग्न रॉबी बरोबर होते. पण रूमीच्या मनातून विकी काही जात नाही. त्यामुळे पुढे नेमके काय घडते त्यासाठी सिनेमा पहायला लागेल.

ही प्रेमकथा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी हळुवारपणे दिग्दर्शित केली असून कथा लेखिका कनिका धिल्लोन यांनी कथा विस्तार सुरेख केला आहे. प्रत्येक प्रसंग हा उठावदार कसा होईल याकडे लक्ष दिलेले जाणवते. कथेमध्ये अनेक भावनांचे धक्के आहेत ते धक्के सुद्धा आपणाला सुखावतात,

तापसी पन्नू हिने साकारलेली रुमीची व्यक्तिरेखा चांगली लक्षांत राहते, प्रेम / राग आणि भावनांचा झालेला मनांचा कल्लोळ तिने छान रंगवला आहे. तिची भूमिका शेवटपर्यंत लक्षांत रहाते. विकी ची भूमिका विकी कौशल यांनी मनापासून केली आहे तो रुमीवर प्रेम करतो पण त्याला जबाबदारी त्याला नको असते. रॉबी ची भूमिका अभिषेक बच्चन यांनी अत्यंत संयमाने साकारलेली असून त्या भूमिकेमधील बारीक-सारीक बारकावे उत्तमपणे पेश केले आहेत. सर्व भावना उत्कटपणे तरीही संयमाने दाखविल्या आहेत. अमित त्रिवेदी यांचे संगीत आणि आरती बजाज यांचे संकलन छान आहे.

शेवटी नेमके काय घडते ? रुमी हि रॉबी पासून दूर जाते का ? विकीचे लग्न रुमी बरोबर होते का ? रॉबी आपल्या लग्नाविषयी कोणता निर्णय घेतो ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या सिनेमात मिळतील ,, एक हलके-फुलके मनोरंजन करणारा प्रेमाचा त्रिकोण आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.