पुण्याच्या धरणसाखळीमध्ये 80.93% पाणीसाठा

एमपीसी न्यूज- पुणे शहरात पावसाचा जोर नसला तरीही पुण्याच्या आसपास असलेल्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे या धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. आज सकाळी सहा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार खडकवासला 100%, पानशेत 98.39%, वरसगाव 71.72%, आणि टेमघर धरणात 52.51% इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुण्याच्या धरणसाखळीमध्ये 80.93% पाणीसाठा निर्माण झाला आहे.

शुक्रवार सकाळी सहा वाजल्यापासून आज (शनिवार) सकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासला येथे 04 मिमी, पानशेत 32 मिमी, वरसगाव 31 मिमी तर टेमघर धरण परिसरात 66 मिमी पावसाची नोंद झाली आहे. चारही धरणात एकूण 23.59 टीएमसी म्हणजे 80.93% टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी 16.77टीएमसी 57.53% पाणीसाठा तयार झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.