पवना धरण 93.47% भरले; पाण्याचा विसर्ग 2785 क्युसेक्स वेगाने

एमपीसी न्यूज – मावळ भागात होत असलेल्या संततधार पावसामुळे पवना धरणाच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. आज (शनिवारी) सकाळी सहा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार हायड्रो पॉवर आऊटलेटद्वारे 1394 क्यूसेक या वेगाने तर सांडव्यावरून 1391 क्यूसेक या वेगाने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. एकूण विसर्ग 2785 क्युसेक्सने होत आहे.

यंदा पवना धरण परिसरात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. शुक्रवारी दिवसभरात 70 मिमी पावसाची नोंद झाली असून एक जूनपासून आजपर्यंत 2262 मिमी पाऊस पवना धरण परिसरात झाला आहे. त्यामुळे पवना धरण 96.35 % इतके भरले असून उपयुक्त पाणी साठा 8.225 टिएमसी इतका झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.