Talegaon Dabhade : कर्करोग जागरूकता अभियान शिबिराचा 100 रुग्णांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज- माईर्स एम. आय .टी संचलित एम. आय .एम .आर. वैद्यकीय महाविद्यालय डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कर्करोग जागरूकता अभियान आणि कर्करोग निदान व उपचार शिबिराचा 100 रुग्णांनी लाभ घेतला

या शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या स्त्री रोग विभागाच्या प्राध्यापक डॉ.सुषमा शर्मा तसेच शल्य चिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सचिन नाईक तसेच सुप्रसिद्ध कर्करोग विशेषज्ञ डॉ.जयपालरेड्डी पोगल व अन्य सहकारी डॉक्टरांनी जवळपास 100 हून अधिक रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व तपासणी, सोनोग्राफी, बायोप्सी आणि पॅप स्मियर मोफत आणि उपचार, शस्त्रक्रिया व कीमोथेरेपी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी राहण्याचा खर्च मोफत असेल अशी माहिती महाविद्यालयाच्या विश्वस्त व कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक मोरे यांनी दिली.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये आढळून येणारा कर्करोगाचा प्रमुख प्रकार आहे. या कर्करोगाचे निदान व शस्त्रक्रिया उपचार तसेच केमोथेरपी उपचार डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय येथे अत्यंत माफक दरात उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.