Alandi : शांतिब्रम्ह ह भ प मारुती बाबा कुरेकर यांचा 93 वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – आळंदी येथील दि.20 रोजी आज फ्रूटवाले धर्मशाळेत शांतिब्रम्ह ह भ प मारुती बाबा कुरेकर यांचा 93 वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला.

PCMC : आता दर शनिवारी ‘दप्तराविना शाळा’

अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त सकाळी 9 ते 11 यावेळेत ह भ प संदीपान महाराज शिंदे यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले.ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हस्ते हजारो वारकरी ,नागरिकांच्या उपस्थित बाबांचे गुरूपूजन करण्यात आले.

तसेच यावेळी ह भ प माणिक शास्त्री मुखेकर,संदीपान महाराज, ह भ प नारायण महाराज जाधव ,ह भ प बाजीराव नाना चांदीले यांचे पूजन करण्यात आले.यावेळी आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील,ह भ प तुकाराम महाराज मुळीक ,जोग वारकरी शिक्षण संस्था गुरुजन विश्वस्त, गावकरी मंडळी आजी माजी विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.